निस्वार्थ प्रेमाचा अन् अखंड श्रमाचा झरा अन सोलापूरचे शिल्पकार म्हणजे सुशीलकुमार शिंदे - ॲड. मनीश गडदे पाटील सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी मुंबई
आपल्या ५५वर्षांच्या नैतिक व प्रामाणिक
सामाजिक जीवनात आणि राजकीय कारकीर्दीत भूषवलेली सर्व सन्मानांची पदे व संवैधानिक
जबाबदारी पार पाडताना आपल्या जन्मभूमी सोलापूर करिता सतत विकासाचा हक्काचा वाटा
पोचवण्याचं प्रामाणिक काम सोलापूरचे सुपुत्र आदरणीय सुशीलकुमार शिंदे यांनी
जाणीवपूर्वक केल्यानेंच सोलापूरचं नाव आज देशाच्या नव्हे तर जगाच्या नकाशावर
ठळकपणे प्रतिबिंबीत होत आहे.
दगडू संभू शिंदे उर्फ सुशीलकुमार
संभाजीराव शिंदे, गरीब घरातला एक सामान्य तरुण ते असामान्य व्यक्तिमत्त्व हा
प्रवास कदाचित पुढील पिढ्यांमध्ये अविश्वसनीय वाटावा असाचं आहे. जीवनात एक माणूस
आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल, खासदार, केंद्रीय
मंत्री, देशाचा गृहमंत्री,
संसदेचा नेता ही सर्व भारतीय लोकशाहीतील
संविधानिक पदे आपल्या कर्तृत्वाने भूषवतो हि बाब स्वतंत्र भारतात अभिमानास्पद आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे फोरम
फॉर सोशलीस्ट ॲक्शनचे
राज्य निमंत्रक, महाराष्ट्र
प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष,
केंद्रीय सरचिटणीस, 14 राज्याचे
प्रभारी, सर्वोच्च काँग्रेस वर्किंग कमिटी CWCमेंबर, उपराष्ट्रपती
पदाचे उमेदवार, नियोजन घटना शिस्तपालन समितीचे सदस्य यासह अनेक संघटनात्मक
जबाबदारी शिंदे साहेबांनी पार पाडली आहे.
देशातील अनेक विद्यापीठांनी मानद डि.लीट
पदवीने सन्मानीत करून त्यांचा गौरव केला आहे,
कुलपती होण्याचा बहुमान सुद्धा त्यांना
मिळाला, जगातील सर्वोच्च "युनो" मध्ये भारताचे प्रतिनिधित्व
करून आंतरराष्ट्रीय स्तरावरील बालकामगार व असंघटीत कामगारांच्या प्रश्नावर प्रबंध
सादर करण्याचे भाग्य त्यांना मिळाले.
आपल्या गौरवशाली प्रवासात सुशीलकुमार शिंदे
यांनी स्वतःची "सोलापूरचा सुपुत्र" ही ओळख सातत्याने सर्वत्र ठसविली
म्हणूंनच आजही भारतात कोणत्याही शहरात गेलेल्या सोलापूरकरांना सोलापूरचा आहे
म्हटल्यावर "सुशीलकुमार शिंदे जी का गांववाला है|" म्हणून
आदराने सन्मान दिला जातो हि खरंतर आपल्या सर्व सोलापूरकरांसाठी अभिमानास्पद बाब
आहे.
सोलापूर शहर व जिल्हा याचा सामाजिक, पायाभूत, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक
विकास सातत्याने डोळ्यांसमोर ठेवून १०लाख लोकसंख्येचं बहुभाषिक कामगारांचे शहर व
सुमारे 40 लाख लोकसंख्येचा दुष्काळी अवर्षणग्रस्त जिल्हा हि ओळख असताना
आपल्या सोलापूरची सर्वांगीण प्रगतीची गरज ओळखून आजपर्यंत दरवेळी अनेकानेक
नाविन्यपूर्ण कामे आदरणीय शिंदे साहेबांच्या मेहनतीने, नियोजनाने, दूरदृष्टीने, सातत्यपूर्ण
प्रामाणिक प्रयत्नाने साकारली आहेत..
सर्वांगीण विकास कामांची यादी तशी मोठी
आहे तरीसुद्धा हा थोडक्यात आढावा घ्यावा लागतोय...,
महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री असताना
सोलापूरची वरदायिनी भीमा नदीवर "उजनी धरणाच्या" योजना, कालवे, वितरिका, मोठे
मध्यम साठवण तलाव यांना सलग दहा वर्षे एक रुपया कमी पडू दिला नाही आज त्याची
प्रचीती म्हणून जिल्ह्यात डाळिंब, द्राक्ष,
केळी,
बोर फळबागांचे प्रचंड उत्पादन तर
बागायती उसाचे क्षेत्र वाढून देशात सर्वोच्च एका जिल्ह्यात 42 साखर
कारखाने उभारलेत. राष्ट्रीय ज्वारी,
डाळिंब,
ताग संशोधन केंद्र कार्यान्वित आहेत, सोलापूर
शहरासाठी उजनी धरणावरून 110 कि.मी. लांबीची पाइपलाइन सोलापूरकरांची तहान भागवते आहे, ४५वर्षापूर्वी
आणलेलं आकाशवाणी केंद्र अविरत मनोरंजन करत आहे.
'मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य'
असताना सोलापूरला एका जिल्ह्यासाठी
स्वतंत्र विद्यापीठ मंजूर केलं आणि जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती झाली आज रोजी
जिल्ह्यात 150 महाविद्यालये, दोन मेडिकल कॉलेज, दोन
आयुर्वेदिक कॉलेज, दोन होमिओपॅथिक कॉलेज,
27 इंजिनिअरिंग/ डिप्लोमा कॉलेज, एकमेव
विज्ञान केंद्र यांनी जिल्ह्याचा शैक्षणिक वटवृक्ष बहरला असून लक्षावधी तरुण
विद्यार्थी दर्जावान पदवीसंपन्न होत आहेत.
सोलापूरचे "छत्रपती शिवाजी महाराज
सर्वोपचार रुग्णालयाचा" कायापालट केला व विस्तारित 'बी' ब्लॉक
नव्याने बांधल्याने आज रोजी रोज ५०००हजार रूग्णांची ओपीडी चालू असून, १५००
रुग्णांच्या ऍडमिटची सोय झाल्याने सोलापूर आजूबाजूच्या जिल्ह्यातील जनतेच्या
रूग्णसेवेला सक्षम झाल्याने विविध हॉस्पिटल्स,
डायग्नोस्टिक सेंटर्स, प्रथितयश
डॉक्टर्स यांचे उत्कृष्ट नेटवर्क निर्माण झाले असून आज सोलापूर 'मेडिकल
हब' म्हणून ओळखले जात आहे.
केंद्रीय मंत्री म्हणून भारताच्या
मंत्रिमंडळात काम करताना उर्जामंत्री असताना 1320मेगावॅट NTPC
वीजनिर्मिती प्रकल्प उभारला, 5000 मेगावॅटचे
पाॅवरग्रिड उभारले यामुळेच हजारो रोजगार निर्मितीचे साधनं निर्माण झाली, अर्थकारण
वाढलं, विशेषतः सन 2012 सालापासून सोलापूरला लोडशेडिंगचा त्रास
बंद झाला. याच काळात सोलापुरात आंतरराष्ट्रीय डॉक्टर कोटणीस यांचे स्मारक उभारले
गेले जे संपुर्ण जगातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.
देशाच्या स्तरावर "गृहमंत्री व
संसदेचा नेता" म्हणून काम करताना सोलापूरला 7नॅशनल हायवे मंजूर झाले, देशातील
सर्व दिशेला प्रयत्नपूर्वक रेल्वे सेवा चालू केली आणि सोलापूर शहर-जिल्हा देशाच्या
कानाकोपऱ्यात जाणायोग्य दळणवळणाने सिद्ध झाला,
सोलापूर जिल्हा देशाच्या नकाशावर आला.
गृहमंत्री म्हणूनच निमलष्करी दलाची तीन ट्रेनिंग मिलिटरी सेंटर BSF, CISF, SSB ही
मंजूर केली.
सोलापूर शहराच्या पायाभूत विकासाकरता
नियोजन, वित्तआयोग,
UIDSSMT, JNNURM, नगरोत्थान
योजनांमधून हजारो कोटी रुपये मंजूर करून रस्ते,
ड्रेनेज,
पाण्याच्या टाक्या, वसाहती, सुविधा
निर्माण केल्या. सोलापूरचा स्मार्ट सिटी समावेश याच आधारावर झाला आहे. शहरात तीन
एमआयडिसी निर्माण झाल्या, शहरातील मध्यवस्तीमध्ये 1975
ला चालू केलेले विमानतळ असताना
भविष्याची गरज ओळखून बोरामणीला आंतरराष्ट्रीय 'कार्गोहब'
विमानतळ मंजूर केले दोन हजार एकर जमीन
संपादित केली आहे.
धार्मिक यात्रेकरूंना आज सोलापूर, पंढरपूर, अरण, मार्डी, वडवळ, मंगळवेढा, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर, कुडलसंगम
ही सर्व तीर्थक्षेत्रे पर्यटन विकासाची केंद्रे झाली आहेत. सोलापुरात हुतात्मा
स्मृती मंदिरचे नूतनीकरण व फडकुले सभागृहाची उभारणी,
महामहिम राष्ट्रपतींच्या उपस्थितीत ८८वे
अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे भव्यदिव्य आयोजन,
उर्दू संमेलनाचे आयोजन, दमाणी-पटेल
पुरस्कार हे सर्व सोलापूरच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या बाबी आहेत.
सुशीलकुमार शिंदे साहेबांचा कलावंत म्हणून रसिकांचा उत्साह वाढवणारी आहेत.
लोककल्याणकारी भारतातील लोकप्रतिनिधी
म्हणून सोलापूरच्या जनतेने दिलेल्या प्रचंड प्रेमाची व दाखवलेल्या विश्वासाची
उतराई कृतज्ञतेच्या स्वरूपात सुशीलकुमार शिंदे यांनी आपली संपूर्ण राजकीय ताकद
पणाला लावून सोलापूरसाठी प्रामाणिकपणे भरभरून देण्याचा प्रयत्न आजपर्यंत केला आहे.
हा निस्वार्थ प्रेमाचा अन् अखंड श्रमाचा सोलापूरचा 'भगीरथ'
म्हणूनच "सोलापूरच्या सर्वांगीण
विकासाचा शिल्पकार!" आहे असं माझं ठामं मत आहे.

Comments
Post a Comment