Skip to main content

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी



संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ
उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी

मुंबई, दि.१३: १५ सप्टेंबर रोजी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राज्यातील ४३४ आयटीआयमध्ये जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने संविधान मंदिराचे लोकार्पण होणार आहे. तसेच २० सप्टेंबर रोजी राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र' आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेचा शुभारंभ होणार आहे. 

कार्यक्रमांसाठी प्रमुख उपस्थिती
संविधान मंदिरांचा लोकार्पण सोहळा राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत रविवार दि१५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक महाविद्यालय येथे होणार आहे.                               

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेचा शुभारंभ कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी, केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री गिरिराज सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत.

संविधान मंदिर
राज्यातील आयटीआयमध्ये संविधान मंदिराची स्थापना केली जाईल. या मंदिराच्या माध्यमातून संविधानाची शिकवण आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार सुद्धा नित्यनियमाने होईल. या ठिकाणी विविध शैक्षणिक कार्यक्रम, परिसंवाद, संवैधानिक घटनांचे स्मरण आणि ऐतिहासिक महत्व प्राप्त असलेल्या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. 

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्व देण्यात आलेले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीतंर्गत “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. १००० नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी २५०० महाविद्यालयात प्रत्येक कौशल्य विकास केंद्रात प्रतिवर्षी साधारण १५० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण राज्यात १५ ते ४५ वयोगटातील दरवर्षी साधारण १ लाख ५० हजार युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण संपूर्णपणे मोफत असून या योजनेसाठीचा सर्व खर्च कौशल्य विकास विभाग करणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना

महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला स्टार्टअप्सला निधी तसेच आर्थिक पाठबळ देण्यासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना' सुरू करण्यात आली आहे. या योजनेत राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे, देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे हा योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी १०० कोटी निधीची तरतूद करण्यात आली असून, सुमारे १००० स्टार्टअप्सना २५ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मंत्री लोढा म्हणाले, "अनेक कौशल्य संपन्न आणि नीतिमंत व्यक्तिमत्वांनी भारत देशाला घडवण्यासाठी योगदान दिले आहे. आज त्यांच्या मेहनतीमुळे आपण आजवर इतकी प्रगती करू शकलो आहोत. संविधान मंदिराच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला संविधान निर्मितीचा इतिहास, त्याचे महत्व, येणाऱ्या पिढीला समजावे हा आमचा प्रयत्न आहे. येणारा काळ हा युवाशक्तीचा आहे, भारतातील युवकांसाठी सुवर्ण संधींचा आहे. त्यामुळे या युवकांना कौशल्य संपन्न आणि नीतिमंत बनवणे मी आपली जबाबदारी समजतो. असाच युवा फक्त भारतालाच नाही, तर जगाला सुद्धा उज्ज्वल भविष्याकडे नेण्याची ताकद बाळगतो. संविधान मंदिर आणि महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र उभे करण्यामागे आमचा हाच उद्देश आहे. नक्कीच युवकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळेल. आदरणीय उपराष्ट्रपती जगदीप धनखडजी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी कार्यक्रमास येण्यासाठी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो!"

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस आणि दिग्गज नेते आणि शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे संपन्न होत आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

  दिल्लीत जागर मराठीचा …  संदेश महाराष्ट्राच्या ऐक्याचा ….महाराष्ट्राचे दिग्गज नेते आणि शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे संपन्न होत आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन  एक अपूर्व योग जुळून आलाय …  आपल्या मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आणि याच पार्श्वभूमीवर ,  मायमराठीचा जागर करण्यासाठी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१ ,  २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत संपन्न होत आहे. प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद अशी ही बाब. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा …  ही केवळ कविकल्पना नाही तर आपल्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे ,  याचा प्रत्यय आपणास या ऐतिहासिक संमेलनातून येणार आहे. भाषा ,  संस्कृती ,  राष्ट्रभावना ,  मानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हे ,  अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन  ` सरहद ,  प...

अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी मोदी च्या भारत सरकारने काश्मीरची स्वायत्तता काढून घेतली आणि कश्मीर अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी खुला केला ..... सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक होऊ नका ! सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक असल्याचे बोलले जात आहे यात सोलापुरातील हद्दवाढ आणि मुस्लीम जनता उएथे राहते आहे त्या भागात आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचे झेंडे लावण्यात येत आहेत आणि मुस्लिमांना वाटते आहे कि पाकिस्तानचा झेंडा म्हणजे मुस्लीम धर्मीय चा झेंडा पण माझ्या मुस्लीम बाधवनो असे असत नाही माझा मुस्लीम धर्मास विरोध नाही मात्र आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचा झेंडा कशासाठी , धर्माचा आदर दर्शविण्या साठी हिरव्या रंगाची कपडे घाला तसच हिरव्या रंगाची पताका हातात घेऊन धर्माचा प्रसार करा मात्र पाकिस्तानचा झेंडा हातात घेऊ नका .

  अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी   मोदी च्या भारत सरकारने काश्मीरची स्वायत्तता काढून घेतली आणि कश्मीर   अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी  खुला केला .... . सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक होऊ नका ! सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक असल्याचे बोलले जात आहे यात सोलापुरातील हद्दवाढ आणि मुस्लीम जनता उएथे राहते आहे त्या भागात आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचे झेंडे लावण्यात येत आहेत आणि मुस्लिमांना वाटते आहे कि पाकिस्तानचा झेंडा म्हणजे मुस्लीम धर्मीय चा झेंडा पण माझ्या मुस्लीम बाधवनो असे असत नाही माझा मुस्लीम धर्मास विरोध नाही मात्र आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचा झेंडा कशासाठी , धर्माचा आदर दर्शविण्या साठी ह...

मध्यवर्ती गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट नेहरूनगरचे चालू वर्षाचे समाजोपयोगी उपक्रम

   मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे चालू वर्षातील सामाजिक उपक्रम सोलापूर दिनांक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे चालू वर्षातील उपक्रम खालील प्रमाणे भरण्यात येणार आहेत हे राजे शादी यांच्या स्मरणार्थ २१   हजार रुपये हमारी उज्वला एस बी ए शिक्षणा शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात आली २००   वीरशैव बंधना सूर्याचे सोहळे कपडे वाटप सिद्धेश्वर देवस्थान येथे करण्यात येणार आहेत शिवदारे कॉलेज डी फार्मसी व या दोन्ही कॉलेज विजापूर रोड येथे मुलींसाठी दोनशे वीरशैव बाजूंना पूजेचे सगळे कपडे वाटप श्री सिद्धेश्वर देवस्थान येथे करण्यात येणार आहे शिवदारे कॉलेज डी फार्मसी व दोन्ही कॉलेज विजापूर रोड येथे मुलींसाठी माझे आरोग्याची काळजी मी घेणार या व्याख्यानाचे विद्या कोळी एफबी फोटो वेलणकर डॉक्टर श्रीमती शृंगारपुरे ही डॉक्टर संस्कृती वळसनकर यांचे व्याख्यान तर मुलींच्या सोबत वाताला घडवून आणण्यात येणार आहे जुना विजापूर नाका ते ऐकून मधल्या २००   झाडांचे रोपे क्रीडा अधिकारी महाराष्ट्र शासन व मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्या ...