Skip to main content

Posts

Showing posts from September, 2024

पर्यायी व्यवस्था होईपर्यंत एकही घर हलविणार नाही तडवळा ता. तुळजापूर येथील रेल्वे प्रकल्प बाधित कुटुंबियांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा दिलासा

पर्यायी व्यवस्था होईपर्यंत एकही घर हलविणार नाही तडवळा ता. तुळजापूर येथील रेल्वे प्रकल्प बाधित कुटुंबियांना आमदार पाटील यांचा दिलासा जोपर्यंत तडवळा गावातील नागरिकांच्या घरांची पर्यायी व्यवस्था होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला राहत्या घरातून कोणीही हलवणार नाही, काळजी करू नका. पर्यायी घरांसाठी जिल्हा प्रशासन योग्य जागा शोधून देईल, तोपर्यंत तुम्हाला अडचणीत टाकून कुठलेही काम पुढे जाणार नाही अशा शब्दात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर तालुक्यातील तडवळा येथील ग्रामस्थांना दिलासा  दिला. सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नव्याने होत असलेल्या रेल्वेमार्गात तुळजापूर तालुक्यातील तडवळा येथील दलीत वस्तीसह गावातील काही घरे बाधित होत आहेत. आमदार पाटील यांनी गावात जावून त्यांची भेट घेतली. त्यांच्या अडचणी तसेच म्हणणे आस्थेवाईकपणे जाणून घेत त्यांना दिलासा दिला. जागेचा वाढीव मावेजा मिळवून द्यावा, राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती ग्रामस्थांनी आमदार पाटील यांच्याकडे केली. त्यावरून ग्रामस्थांना दिलासा देत विस्थापित कुटुंबांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत महसूल यंत्रणेला निर्देश द...