महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस आणि दिग्गज नेते आणि शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे संपन्न होत आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
दिल्लीत जागर मराठीचा … संदेश महाराष्ट्राच्या ऐक्याचा ….महाराष्ट्राचे दिग्गज नेते आणि शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे संपन्न होत आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एक अपूर्व योग जुळून आलाय … आपल्या मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आणि याच पार्श्वभूमीवर , मायमराठीचा जागर करण्यासाठी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१ , २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत संपन्न होत आहे. प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद अशी ही बाब. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा … ही केवळ कविकल्पना नाही तर आपल्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे , याचा प्रत्यय आपणास या ऐतिहासिक संमेलनातून येणार आहे. भाषा , संस्कृती , राष्ट्रभावना , मानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हे , अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन ` सरहद , प...

Comments
Post a Comment